Share

जो रूटची द्विशतकी खेळी ; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात

Published On: 

 चेन्नई : चेन्नईच्या  एम. ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा हिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डोम सिब्ली आणि बेन स्टोक्सने त्याला चांगली साथ दिली ज्यामुळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला.

सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 80 धावांचे योगदान दिले. ओली पोपने 34, रोरी बर्न्सने 33 आणि जोस बटलरने 30 धावा केल्या. डोम बेसने 34 धावा केल्या. संघ अडचणीत असताना रूटने पहिले सिब्ली आणि स्टोक्ससह मोठी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. भारताचे फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या धावगतीला वेसण घालण्यात अपयशी ठरले आणि धावा लुटवल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली होती. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (७ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने पहिल्या डावातील १८१ षटकापासून ८ बाद ५५५ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!