Share

कुलगुरूंचे नागराज मंजुळेंना अभय आहे का?

Published On: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थांचे खेळण्याचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना शुटींगसाठी भाड्याने दिले होते. नियमबाह्य पद्धतीने मैदान भाड्याने दिल्यामुळे राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तरी देखील विद्यापीठाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून विद्यापीठ प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १८ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत आहे. यासंदर्भात बोलण्यास कुलगुरू टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

सदर प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. तसेच खुद्द राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र विद्यापीठाने राज्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना गांभीर्याने घेतल्या नसून राज्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र देशाने कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता. गेल्या दोन दिवसांपासून मी मिटिंग मध्ये असल्याचे कुलगुरू सांगत आहेत. त्यामुळे कुलगुरू हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

( महाराष्ट्र देशाने दोन दिवसांपासून कुलगुरूंची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण कुलगुरूंनी मिटिंग मध्ये असल्याचे कारण सांगत बोलणे टाळले)

kulguru calling

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!