Share

‘सरकारला राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?’

Published On: 

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे. याच्याच निषेध म्हणून गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर सांगली तसेच सबंध राज्यातील पूरग्रस्त शेतकरी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये पंचगंगा पायी पदयात्रा आणि परिक्रमेच्या माध्यमातून चालत आहेत. स्वाभिमानी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी राज्य सरकारला गंभीर सवाल केला आहे. आज राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत हजारो पूरग्रस्त शेतकरी नृसिंहवाडीकडे नदीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी निघाले आहेत.

सरकारने शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा आणि शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे पाप माथी मारुन घ्यायचं नसेल तर आज तात्काळ मंत्रीमंडळ बैठक बोलावून, खऱ्या अर्थाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असं म्हणत बागल राज्य सरकारला सुनावलं आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही यामुळेच पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. या रोषालाच वाचा फोडण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले आहे. मात्र आज शेवटचा दिवस असतानाही हे सरकार राजू शेट्टी व सोबतच्या हजारोंच्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यावेळी बागल यांनी केला आहे.

राजू शेट्टी साहेब व चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. आणि आज निर्णय न झाल्यास आज पेटलेल्या शेतकऱ्यांच्या या वणव्यात सरकार व त्यांचा अहंकार दोन्ही भस्मसात होतील, असा गंभीर इशाराही यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!