मुंबई – महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची… रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला लगावतानाच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.
हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख
- राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये युवक काँग्रेसकडून निदर्शने!
- असत्यावर विजय मिळवताना मी सर्व त्रास सहन करेल, गांधी जयंतीच्या शुभेच्छा – राहुल गांधी
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून अभिवादन
- विसरू नका निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, भुजबळांचा योगींना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

