Share

‘महिलेने केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो?’ ; चित्रा वाघ बरसल्या

Published On: 

पुणे : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.

आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. या आरोपांना आता संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे असून मीडिया खात्री न करता या बातम्या चालवत आहेत, असं विधान शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलं होतं.

मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे संजय राठोड यांनी सांगितले आहे. आज सकाळी संजय राठोड यांनी पत्रकार परिषेद आयोजित केले होती. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडीत महिलेची तक्रारही राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? हा सत्तेचा माज नाही तर काय आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या जाणार आहेत, असं चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

तसेच पीडित महिलेने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर कायम ठेवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटलंय. तर माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते. राठोड यांचं विधान धक्कादायक आहे. ही कसली मग्रुरी आहे. हा सत्तेचा माज आहे, असा घणाघात यावेळी चित्रा वाघ यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!