नाशिक : येथील एका खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करणारे जितेंद्र भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन करत गर्दी करणाऱ्या महिला, पुरुषांविरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या कायदेशीर कारवाईमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भावे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन त्यांना कडक शब्दांत पोलिसांनी लेखी समजपत्र दिले आहे.
जितेंद्र भावे यांच्याविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 22 मे रोजी व्हिजन हॉस्पिटलमध्ये एका कोविड रुग्णाला आकारलेले बिल अवाजवी असल्याच्या कारणावरुन भावे यांनी रुग्णाचे नातेवाईक आणि दोन समर्थकांसह हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. डॉक्टर आणि स्टाफला धमकावून बिलाची काही रक्कम न देता निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हानी व नुकसान कायदा तसंच साथरोग कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. व्हिजन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल (26 मे) रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यात जितेंद्र भावे, दोन समर्थक आणि संबंधित रुग्णाचे दोन नातेवाईक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना झापलं, म्हणाल्या… ‘तुमचा बाप आणि भाऊ, तर…’
- ‘अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा कशी काय होऊ शकते?’
- ‘शरद पवार यांचा सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल’
- २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण, म्हणाले…
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीच्या घोळात अडकली का? भाजपाचा राज्य सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

