Share

जालन्यात २१२ नवे कोरोनाबाधित तर ३७४ रुग्णांना डिस्चार्ज!

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित ५ रुग्णांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २१२ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच बरे झालेल्या ३७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना शहर ४०, काकडा १, देवमूर्ती १, जळगाव सोमनाथ ३, पीरकल्‍याण १, खनेपुरी १, वडगाव १, उंबरी १, वडगाव १, मंठा शहर ६, देवठाणा १, गेवराई ४, किनखेडा १, पाटोदा २, पेवा १, तळणी १, ठे. वडगाव १, टोकवाडी २, वाघोडा तांडा १, परतूर शहर ४, आष्‍टी १, आनडगाव २, दहिफळ ३, डोंगरगाव १, हातडी २, कानफोडी १, टाकळी १, वाढोना १ व इतर ठिकाणचे रुग्ण यात आहेत.

अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे १६४ तर अँटिजनमधून ४८ असे एकूण २१२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली. आतापर्यंत ३ लाख ८४ हजार १८९ नमुने तपासण्यात आले, यापैकी ५९ हजार ७३४ अहवाल पॉझिटिव्ह तर ३ लाख २२ हजार ४९ निगेटिव्ह आले. तसेच प्रयोगशाळेत एकूण २ हजार ७४ नमुने प्रलंबित आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!