🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पियानो वाजवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मीराने मास्क घातलेला हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन ही दिलं आहे.
खरं तर अभिनय क्षेत्रातपासून लांब असलेली मीरा राजपूत तिच्याकडे अनेक कलागुण आहेत. मात्र तिच्या या टॅलेंटचा अभिनेता शाहीद कपूर देखील फॅन झाला आहे. दोन मुलांची आई असलेल्या मीराने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या अनेक कलागुणांपैकी एका सुप्त गुण चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
https://www.instagram.com/reel/CT_rz8UlaKf/?utm_medium=copy_link
या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलं की, ती एक प्रशिक्षित पियानो वादक आहे. तसंच मीरा पियानो वाजवताना पती शाहिद कपूर तिथेच एका कोपऱ्यात थांबलेला दिसतोय. कॅप्शनमध्ये “तुम्हाला मी पियानो वाजवते हे माहिती आहे का..! तसेच तिन परीक्षा देखील दिल्या आहेत. तिन वर्षांची असल्यापासून गाणं ऐकल्यावर लगेच वाजवू शकते आणि मला असं वाटत की मी पुन्हा याचे धडे घायला सुरू करणार आहे.’ ती या पोस्टमध्ये पुढे लिहिते’ मी बेखयाली हे गाणं वाजवेपर्यंत त्याने वाट पाहिली.’ ‘बेखयाली’ हे शाहिदच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं आहे. मीराने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी ‘एनडीए’मध्ये यावे – रामदास आठवले
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
