🕒 1 min read
नवी दिल्ली: देशाची फाळणी हे काँग्रेसचेच पाप असून विभाजन हे काँग्रेसच्या रक्तातच असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असतांना विरोधकांनी घोषणाबाजी या घोषणाबाजीत त्यांनी टीकास्त्र सोडले.
७० वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागते आहे. देश फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गात होता. घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. भूसंपादनाबाबतचा अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडणाऱ्यांनी लोकशाही बद्दल बोलू नये, असे सांगत त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. मोदींचे भाषण सुरु होताच तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद नसल्याने तेलगू देसमचे खासदार आक्रमक झाले. घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी नरेंद्र मोदींनी या गोंधळातच भाषण केले.
PM Narendra Modi speaks in Lok Sabha on the motion of thanks to the President's address. pic.twitter.com/bpn32LKzYf
— ANI (@ANI) February 7, 2018

