Share

दिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे

Published On: 

🕒 1 min read

गोड शंकरपाळे- शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकरपाळ्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक गोड शंकरपाळे व दुसरे खारे किवां तिखट मिठाचे शंकरपाळे. शंकरपाळे हा पदार्थ चहा सोबत देखील खाता येतो. याबरोबर साखर असल्यामुळे ते अनेक दिवस टिकू शकतात. जाणून घ्या गोड शंकर पाळ्याची रेसिपी.
साहित्य:
१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
साधारण दिड कप मैदा

कृती:
१) दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. (महत्त्वाची टिप खाली नक्की वाचा) हे मिश्रण कोमट करून घ्यावे.
२) या मिश्रणात तूप गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे. मिक्स करून कोमट दुध घालून मैदा भिजवावा. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.

३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.

टीपा:
१) दुध आणि तूप एकत्र केल्यास काहीवेळा फाटते. म्हणून साखर आणि दुध गरम करून कोमट करावे. तूप निराळे गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे.
२) अमेरिकेत दुध, तूप आणि साखर एकत्र उकळवून मी शंकरपाळे केले होते तेव्हा कधी दुध फाटले नव्हते. बहुदा ते प्रोसेस्ड असल्यामुळे असेल. पण भारतात दुध अन्प्रोसेस्ड असल्यास दुध आणि तूप एकत्र गरम केल्यावर ते काहीवेळा फाटू शकते.
२) दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल. पाणी वापरल्यास पाणी, तूप आणि साखर एकत्र करून गरम करावे. साखर वितळली कि मिश्रण कोमट होवू द्यावे आणि मग मैद्यात घालून भिजवावे.

shankar pale, sweet dish,diwali speical,sweet dish
गोड शंकरपाळे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!