औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २१ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तीन वेळा निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर बँकेची ही पहिलीच निवडणूक होऊ घातली आहे. यातच सुरेश पाटील यांच्यावर खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सुरेश पाटील यांनी आत्महत्या केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात होते.
आता या निवडणुकीत सुरेश पाटील यांचे सुपूत्र माजी आमदार नितीन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर या बँकेमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे,
मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतिष चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाठ, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल आदी राजकारण्यांचा वावर असतो. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात राजकारण होणारी बँक म्हणून या बँकेचा परिचय आहे.
माजी आमदार सुरेश पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली होती. आता कोणत्या राजकाराण्याच्या गटाला यात कितपत यश मिळते यावर अध्यक्षांसह संचालकांचे भवितव्य अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- दिशा रवी अटकेप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’

