🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रासाठी 4714.28 कोटी तर कर्नाटकसाठी 949.49 कोटी रुपयांची दुष्काळ मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
Happy to share that central #Government has approved Rs. 949.49 crore & Rs. 4714.28 crore assistance to #Drought -hit #Karnataka and #Maharashtra respectively for #Kharif 2018-19 season. pic.twitter.com/RVRSrfLjRp
— Radha Mohan Singh (मोदी का परिवार) (@RadhamohanBJP) January 29, 2019
मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी एकूण ७, २१४. ०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, या पॅकेजमध्ये आंध्र प्रदेशसाठी ९००.४० कोटी रुपये, उत्तर प्रदेशसाठी १९१.७३ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी ३१७.४४ कोटी रुपये, गुजरातसाठी १२७.६० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ९४९.४९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणाच्या विविध कामांसाठी या निधीची राज्य सरकारला मदत होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी १३.०९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.


