🕒 1 min read
औरंगाबाद : लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हिंसा घडवणारे आणि चिथावणीखोर सल्ले देणारे देशाचे गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्र यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी केली आहे. मिश्र यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे लखीमपुर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला. यात शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याची भूमिका निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात ठिकाणी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये तीन कृषी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी बांधव आंदोलन करत होते. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना त्याठिकाणी घडली.
यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर बिगर भाजपाशासित राज्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शेती क्षेत्रात प्रचंड संकटे वाढली असतांना शेतकरी आंदोलनावरील हल्ले म्हणजे देशातील जनतेवरील हल्ला आहे, असे ढोबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
