मुंबई : नेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना देण्यात आला. ७ कोटी रुपये रक्कम पुरस्कार देण्यात आला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले गुरुजींच्या नावाची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला त्यांच्या या कामगिरीचे कौतुक नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही केले आहे. डिसले गुरुजी सलाम तुमच्या कामगिरीला ट्विट करून मुंडेंनी कौतुक केलं आहे.
https://twitter.com/Tukaram_IndIAS/status/1334541236728807425
महत्वाच्या बातम्या
- दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही; नाना पटोलेंची जाहीर नाराजी!
- हैदराबाद महापालिकेत भाजपचं ‘भाग्य’ पालटलं ? दक्षिणेत जम बसवण्यासाठी हा ठरू शकतो मैलाचा दगड…
- ‘भ्रमाचा फुगा फुटला; धुळे-नंदुरबार पण आयात केलेला निकाल’
- चंद्रकांत पाटील विनोदी आहेत जास्त लक्ष देऊ नका – शरद पवार
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते


