Share

‘भ्रमाचा फुगा फुटला; धुळे-नंदुरबार पण आयात केलेला निकाल’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयो रथ रोखण्यात यशस्वी झाले.

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरिश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान केले होते.

दरम्यान, या निकालांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. ‘पुणे, औरंगाबाद, नागपुर च्या निकालावरून भाजपा च्या उद्याच्या, परवाच्या, व अनेक वर्षांच्या राजकारणाच्या “दाही” दिशा स्पष्ट… देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार यांच्या अहंकाराला टाचणी. भ्रमाचा फुगा फुटला. धुळे नंदुरबार पण आयात केलेला निकाल’ अशी बोचरी टीका त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!