Share

टायगर आउट सेनेचा ‘वाघ’ इन, बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ आदित्यसोबत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटाची अभिनेत्री दिशा पाटनी नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसमुळे, इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी तिने टाकलेल्या फोटोंमुळे. भारत मध्ये तिने राधा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पण आता मात्र सोशल मीडियात वेगळीच चर्चा सुरू आहे, तेही शिवसेनेशी संबंधित.

जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफबरोबर या अभिनेत्रिचं नाव नेहमीच जोडलेल दिसत. ती टायगर श्रॉफला डेट करते.त्या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही. हे माहीत असलेल्यांनी ‘टायगर जिंदा है आणि ‘एक था टायगर’, टायगर जिंदा है, अशी नावं घेत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने तर ‘खरा टायगर तर ठाकरेच आहे’, अशीही कमेंट एका वाचकाने केली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दिशा सध्या चर्चेत आहेत. आदित्य ठाकरेंबरोबर ती डिनर डेटला गेलेली दिसली. त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिशा पहिल्यांदाच राजकारणी व्यक्तीसोबत दिसली आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. उच्चभ्रू पार्ट्यांना हि अभिनेत्री नेहमी हजेरी लावत असते. परंतु युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंबरोबर एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये दिसली. त्यांचा फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या फॅन पेजवर शेअर झाला आणि सोशल चर्चा सुरू झाल्या.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!