टीम महाराष्ट्र देशा – काही ठिकाणचं लॉकडाऊन शिथील करता येतं का ते बघावं, अशी विचारणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘कोरोना’ या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे.
ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे, अशी सूचनाही पवारांनी यावेळी केली आहे. ‘कोरोना’ साथीला आटोक्यात आणल्यानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील.
त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. ह्या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. तसेच या अडचणीच्या काळात सर्वांनी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक महामारी #COVID_19 च्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. प्रामुख्याने खालील गोष्टी माननीय पंतप्रधान महोदयांच्या निदर्शनास आणल्या.@narendramodi @PMOIndia #LetsFightCoronaTogether pic.twitter.com/Pw8dsE6Lwf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
मी माननीय पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन #COVID_19 संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांगला संवाद आयोजित केला. ही जागतिक समस्या असल्याने सर्व राजकीय पक्ष आपले उचित सहकार्य देतील याचा मला विश्वास आहे. pic.twitter.com/Ep3s0I0oAP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्र सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा.#coronavirus
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
देशात संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे बरच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे.#COVID_19
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. ह्या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी.@PMOIndia #LetsFightCoronaTogether
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

