हिंगोली: शहरातील शासकीय रुग्णालयात इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डस् (आयपीएचएस) च्या अंतर्गत एक कंत्राटी वैद्यकीय आधिकारी नियुक्तीवर आहे. हा अधिकारी शासकीय रुग्णालयात नियुक्ती असताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयात तपासणी करून रुग्णांकडून पैसे उकळत असतो. यामुळे संबधित कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे आदेश राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अभियान संचालकांनी काढले आहेत.
या संदर्भात अभियान संचालकांनी शासकीय रुग्णालयास पत्र पाठवले आहे. त्यामध्ये शासकीय रुग्णालयात इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डस् (आयपीएचएस) अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. मात्र हे वैद्यकिय अधिकारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये खाजगी रुग्णालयात रुग्णांची तपासणी करून पैसे घेत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या संदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या महाव्यवस्थापक कार्यालयाने सविस्तर चौकशी केली.
यात संबंधित वैद्यकीय अधिकारी योजनेतील लाभार्थींची शासकिय रुग्णालयात तपासणी न करता स्वत: च्या खाजगी रुग्णालयात उपचार देऊन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले. या बाबी पत्रात नमूद केल्या आहेत. त्यानुसार संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा तत्काळ समाप्त कराव्यात, असेही या पत्रात नमूद आहे. या संदर्भात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी अशा प्रकारचे पत्र रुग्णालयास प्राप्त झाले नसल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- …मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा; आशिष शेलारांची सुप्रिया सुळेंवर टीका
- शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा : आशिष शेलार

