मुंबई : सध्या भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांवर चित्रपट बनवले जात आहेत. यामध्ये क्रीडा विश्वातील धोनी, मिल्खासिंग, तसेच येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. लवकरचं हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आणि परिणीतीच्या या सिनेमाची नेटक-यांनी जबरदस्त खिल्ली उडवली. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाच्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पद्धतीने हे पोस्टर साकारण्यात आले आहे. पण,हे पोस्टर पाहताच नेटक-यांनी ‘सायना’च्या क्रिएटीव्ह टीमला ट्रोल करणे सुरु केले होते. बॅडमिंटनमध्ये सर्व्हिस खालून होते आणि टेनिसमध्ये सर्व्हिस वरून होते, ही बाब नेटक-यांनी अधोरेखित केली होती. यावरून लोकांनी या पोस्टरला ट्रोल केले गेले. चित्रपटाचे मेकर्स सायना आणि सानिया यांच्यात गोंधळले असल्याचे म्हणत अनेकांनी या पोस्टरची खिल्ली उडवली होती.
https://www.facebook.com/amol.gupte56/posts/10220444384003189
आता चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला आहे. काहीही बकवास करण्यापेक्षा आधी विचार करा, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित, अमोल गुप्ते यांनी ‘सायना’च्या पोस्टरवरून ट्रोल करणा-यांना फटकारले आहे. ‘पोस्टरवर डिजीटल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. टेनिसची सर्व्हिस वाटतेय, सायना सानिया बनलीये वगैरे वगैरे…जर सायना उडणारी शटल आहे, तर राष्ट्रीय रंगाच्या मनगटावरच्या बॅण्डसह मुलीचा हात सायनाच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा असलेल्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदाच्या एवढ्या कल्पक पोस्टरबाबत एवढ्या लगेच प्रतिक्रिया देण्यात येत आहे आणि मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणे, हे दुर्दैवी आहे. बकवास करण्याच्या आधी विचारच करत नाहीत. विचार करा,’ अशी फेसबूक पोस्ट अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ही आजपर्यंतची सर्वात कठीण टेस्ट सीरिज; बेन स्टोक्सचं मोठ विधान
- ५० वर्ष अनिलभय्यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला होता, त्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार नको; भाजप नेत्याची मागणी
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- ‘या अल्लाह, आमच्या PSLला कुणाची नजर लागली’ ; ‘या’ ट्विटनंतर भारतीयांनी घेतली शाळा
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…

