Share

हे फक्त सोलापुरातचं घडू शकते! राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दिला महायुतीला पाठींबा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेतेमंडळी व्यस्त आहेत. पक्षातील जेष्ठ नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचेचं उमेदवार पाडण्याची तयारी केली आहे.

अजित पवार यांनी सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीमधून करमाळा आणि सांगोला येथून उमेदवारी दाखल केलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे आणि संजय पाटील घाटनेकर या दोन आधिकृत उमेदवारांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असं विधान केले आहे.

यावरून गुरुवारी सांगोला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे-पाटील यांनी भाजप शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजी बापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवारांनी टाकलेला डाव दीपक साळुंखे यांनी त्यांच्यावरच उलटवला आहे. अजित पवारांनी दीपक साळुंखे यांच्या ऐवजी शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे साळुंखे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे.

दरम्यान साळुंखे यांनी पाठींबा दिला त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, भाऊसाहेब रुपनर, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, जयमाला गायकवाड, माजी जिप अध्यक्ष सूर्यकांत नाना घाडगे, सांगोला तालुका प्रमुख माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, नगराध्यक्ष आनंद माने, सांगोला शिवसेना शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182538605413072898?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182538363959537664?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182537576688705536?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!