नवी दिल्ली : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने विराट कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, कोहलीच्या कर्णधारपदाचे प्रमुख कारण काय आहे? त्याच्या मते विराटने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळीच छाप पडली आहे.
“कार्तिक पुढे म्हणाला की, मला नाही वाटत विराटने फक्त भारतीय क्रिकेटसाठी एक छाप सोडली आहे. तर त्याने पूर्ण क्रिकेट विश्वासाठी आपली छाप सोडली आहे. ज्याप्रमाणे भारतीय संघाने मागील काळात कसोटी क्रिकेट खेळले आहे. ते खूप जबरदस्त आहे. विराट क्रिकेटमध्ये जी एनर्जी घेऊन आला. ते पाहून पूर्ण क्रिकेट विश्व हैराण होते. व संपूर्ण क्रिकेट विश्वाने याचा आनंद घेतला आहे.”
२०१८ मध्ये झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया मालिकेबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला माझ्या मते सर्वात चर्चेत राहिला तो पुण्यात झालेला सामना ज्यामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. परंतु बेंगलोर मध्ये भारताने चांगले पुनरागमन केले.
भारत आणि श्रीलंकायांच्यात मोहाली येथे ४ मार्च पासून खेळला जाणारा सामना विराटचा कसोटी कारकिर्दीतील शंभरावा सामना असणार आहे. विराटला जवळजवळ दोन वर्षापासून आपल्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा आहे. नोहेंबर २०१९ पासून त्याला एक ही शतक करता आले नाही. त्यमुळे तो आपला १०० सामना सर्वांसाठी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या :

