Share

पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले डिंभे धरण ओव्हर-फ्लो

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले डिंभे धरण ९७ टक्के भरले असून या धरणाच्या दोन दरवाजातून २००० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना डिंभे धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो.

ह्या धरणाचे आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्याला बारा महिने पाणी पुरते. तर, पारनेर, श्रीगोंदा व करमाळा तालुक्यातील शेतीला आठ महिने पाणी दिले जाते. धरणातील पाणी साठ्यामुळे पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे.

कोरोनामुक्त नागपूरसाठी कोळीवाडा-धारावी पॅटर्न राबविणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

गेल्या वर्षी धरण लवकर भरले होते. मात्र यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. अखेर ही चिंता दूर झाल्याने शेतकरी आनंदीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. फक्त पाण्याचे वाटप समान पद्धतीने व्हावे एवढीच माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

चिमुरमध्ये आमदार भागडीयांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!