Share

चिमुरमध्ये आमदार भागडीयांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

चिमुर : राज्य शासनाने सर्वधर्मीयांची देवालये अर्थात मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, जैन मंदिर आदी प्रार्थनास्थळे त्वरित उघडावी, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्य़ात भाजपातर्फे शनिवारी ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी आर्त हाक आंदोलनाच्या माध्यमातून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भागडीया यानी दिलेली आहे.

गेले सहा महिने संपूर्ण जग, देश, महाराष्ट्र कोविड-१९ च्या महामारीचा सामना करीत आहे. लॉकडाऊननंतर राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यास सुरुवात केली तेव्हा राज्यातील जनतेने राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य शासनाने व्यसनाधीन असणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी यादृष्टीने मदिरालये सुरू केली.

गरीबांच्या विकासाचा गडकरींनी सांगितला मार्ग, वाचायलाच हवे हे वृत्त

मात्र, दुसरीकडे आपले आराध्य, श्रद्धास्थानांसमोर भक्तीने लीन होण्यासाठी मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्धविहार, जैन मंदिर आदी प्रार्थनास्थळे मात्र, नागरिकांसाठी सुरू केली नाही. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल्स, मांस, मदिरा चालू झाले मात्र, सर्वधमीर्यांची देवलाये बंद आहेत. त्यामुळे कुंभकर्णी निद्रेत असलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद करण्याची आवश्यकता आहे. इतर राज्यांमध्ये देवालये, प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, हा निर्णय महाराष्ट्रात अंमलात आला नाही.

‘या’ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नाराज, तर कृषिमंत्री झाले नाखूश

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सावधानी बाळगण्याच्या दृष्टीने आवश्यक फलक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, जैन मंदिर आदी प्रार्थनास्थळांसमोर लावण्यात यावे व सोशल डिस्टन्सिंग पाळत ती सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली. आंदोलनात भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले.

निरोगी जीवनासाठी राज्यातील ‘या’ मंत्री महोदयांनी दिला रानभाज्या खाण्याचा सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!