नागपूर : शहरात व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रकोप थांबावा यासाठी धारावी व कोळीवाडासह मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या तज्ञांना प्राचारण करण्यात येणार आहे. हे तज्ञ चार सप्टेंबरला येणार असून, ते नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
या चमूत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह संक्रमक रोग विशेषज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव, गंभीर रोग विशेषज्ञ डॉ. राहुल पंडीत, जनरल सर्जन डॉ. मुफझल लकडावाला, कान नाक घसा विशेषज्ञ डॉ. गौरव चतुर्वेदी यांच्यासह इतर तज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
चिमुरमध्ये आमदार भागडीयांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन
मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावी मुंबईचा इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. तशाच गतीने नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढते आहे.
गरीबांच्या विकासाचा गडकरींनी सांगितला मार्ग, वाचायलाच हवे हे वृत्त
धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी जसे प्रयत्न केले त्याच धर्तीवर नागपुरात काय उपाय योजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. डॉ ओम श्रीवास्तव, डॉ राहुल पंडीत, डॉ मुफझल लकडावाला, डॉ गौरव चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा अनिल देशमुख यांनी दिली.
‘या’ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नाराज, तर कृषिमंत्री झाले नाखूश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

