मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यानंतर राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
याच विषयवार सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. यासंदर्भात पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असे कृत्य करणे योग्य ठरणार नाही. आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये, असे आवाहन करून उपसमितीचे सदस्य तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा, मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’
- खुलताबादेत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, कोरोना रुग्णांची उपचारासाठी औरंगाबादेत धाव
- ‘ज्या गांधी-नेहरू परिवाराला शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर झोडले, आता त्यांचे चरण-चाटण केले जाते’
- रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी ‘त्या’ आरोपींचा दिलेला जमीन रद्द
- पंढरपूरची निवडणूक जीवावर बेतली ;ड्युटीमुळे शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

