Share

वैराग भागाचा विकास दिलीप सोपलचं करू शकतात – निंबाळकर

Published On: 

वैराग: विरोधकांनी घराघरात भांडणे लावण्याचं काम केलं. नाना निंबाळकर गटाचे खच्चीकरण आजवर त्यांनी केलं आहे. परंतु दिलीप सोपल हे कार्यकर्त्यांची जाणं असणारे नेते आहेत. मला न्याय मिळवण्यासाठी सोपल यांच्याशिवाय पर्याय नाही. वैराग भागाचा विकास तेच करू शकतात, असा विश्वास झेडपीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

निंबाळकर यांनी आज शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेेेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काकडे , शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष देवाजी दिंडोरे , बार्शी नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे , युवराज काटे , ऍड. विकास जाधव, बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणेश (नाना) जाधव , माजी नगरसेवक वाहिदपाशा शेख , वैराग ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मकरंद निंबाळकर म्हणाले, माजी आमदार व या भागाचे नेते स्वर्गीय चंद्रकांत निंबाळकर यांच्या गटाला मी त्यांचा पुतण्या असताना सुद्धा आमदार दिलीप सोपल यांनीच मला विविध पदे देवून न्याय दिला, दुसरीकडे राऊत गटाने मात्र त्यांच्या मुलाचा व चंद्रकांत निंबाळकर यांच्या नावाचा नुसता वापर करून घेतला आहे. त्यामुळे मी दिलीप सोपल यांचे नेतृत्वाखाली काम केले आहे आणि पुढे ही करणार.

 

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181563809468567553?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!