Share

राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार सांगलीच्या महापौरपदी ‘असा’ झाला विराजमान

Published On: 

सांगली – सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदाचा धक्कादायक निकाल लागला असून सांगली मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी निवडून आले.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली.

भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मारली बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजपचा पराभव केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!