🕒 1 min read
नवी दिल्ली: काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी भाजप नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते.
दरम्यान आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. याबाबत भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले की, “त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते आज रस्त्यावर उतरले आहेत.”
या प्रकरणी आप नेते राघव चढ्ढा यांनी ट्वीट करत म्हटले की,” पंजाबमधील पराभवानंतर भाजपला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पंजाबच्या पराभवाच्या रागात भाजप अशा बेगडी राजकारणावर घसरला आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- 100 कोटींच्या क्लबमध्ये RRR ची धमाकेदार एन्ट्री; चित्रपटाने रचला नवा विक्रम
- “महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे”, राष्ट्रवादीची टीका
- IPL 2022 :संघाने सामना गमावला ; मात्र हैदराबादच्या ‘या’ तरुण गोलंदाजांचे रवी शास्त्रीने केले कौतुक
- IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!
- “एसटी संपाला भाजपची फूस”- नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
