Share

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ची संवाद यात्रा

Published On: 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात आम आदमी पार्टीने थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून त्यासाठी संवाद यात्रा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. बिहार विधानसभा, मराठवाडा पदवीधर निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक कार्यक्रम घोषित होईल, अशी शक्यता होती.

मात्र, वार्ड आरक्षण प्रश्नी न्यायालयात याचिका दाखल असल्याने अद्याप कार्यक्रम जाहीर झालेला नाही. निवडणूक केव्हाही घोषित होऊ शकतात हे लक्षात घेत भाजप, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुक कामाला लागले आहेत. त्यात आम आदमी पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘आप’ने थेट जनतेच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.

जनतेचे प्रश्न जाणून घेत आम आदमी पक्ष प्रत्यक्ष गल्लोगल्ली फिरत आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी शहराच्या विकासासाठी काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी आपचे कार्यकर्ते संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मराठवाडा अध्यक्ष सुभाष माने, मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, शहर कार्याध्यक्ष इसाक अंडेेवाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तू पवार, शहर सचिव अशी जयहिंद, शहर संघटनमंत्री मंगेश गायकवाड, गौरव भार्गव यांच्यासह कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून ही यात्रा सुरू झाली आहे. गुलमोहर कॉलनी, सिडको यांसह पुंडलिक नगर, गारखेडा, सातारा देवळाई, शिवाजीनगर, नागसेन नगर, मिलिंद नगर, कबीर नगर आदी विविध भागातील छोटे मोठे दुकानदार, विक्रेते, नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून निवडणुकीपर्यंत यात्रा सुरू राहणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेच्या सर्व जागा आप लढविणार असून जनतेकडून मिळणारा प्रतिसाद पाहता दिल्लीप्रमाणे औरंगाबादचा विकास करण्याची संधी निश्चित मिळेल असा दावाही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!