धुळे : धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपा नेत्यांची चर्चा झाली. यात धुळे नंदुरबार भाजपासाठी तर काँग्रेसला कोल्हापुरची जागा देण्याचे निश्चीत झाले. त्यामुळे धुळे-नंददुरबार विधनपरिषदेसाठी काँग्रेसच्या गौरव वाणी यांनी (Gaurav Wani) उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपा नेते अमरिश पटेल (Amrish Patel) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
धुळे व नंदुरबार विधानपरिषदेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या विजयामुळे भाजपालाही बळ मिळाले आहे. अमरिशभाई यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! pic.twitter.com/jjESlYgbFn
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 26, 2021
या निवडीनंतर अमरिश पटेल यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. वाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र स्वीकारलं. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी अमरिश पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
काँग्रेसशी पटेल यांचे चांगल संबंध
भाजपा आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं होऊन भाजपाला जागा मिळाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. अमरिश पटेल यांनी मोठा काळ काँग्रेस पक्षात घालवला आहे. त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसपासूनच सुरु झाली. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी नेहमीच त्यांच्या मदतीसाठी तत्पर असते अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर


