Share

धुळे नंदुरबार विधान परिषद; भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध

Published On: 

धुळे : धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपा नेत्यांची चर्चा झाली. यात धुळे नंदुरबार भाजपासाठी तर काँग्रेसला कोल्हापुरची जागा देण्याचे निश्चीत झाले. त्यामुळे धुळे-नंददुरबार विधनपरिषदेसाठी काँग्रेसच्या गौरव वाणी यांनी (Gaurav Wani) उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपा नेते अमरिश पटेल (Amrish Patel) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीनंतर अमरिश पटेल यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. वाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र स्वीकारलं. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी अमरिश पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

काँग्रेसशी पटेल यांचे चांगल संबंध
भाजपा आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं होऊन भाजपाला जागा मिळाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. अमरिश पटेल यांनी मोठा काळ काँग्रेस पक्षात घालवला आहे. त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसपासूनच सुरु झाली. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी नेहमीच त्यांच्या मदतीसाठी तत्पर असते अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!