Share

 धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर(78) यांचं पुण्यात वृध्दापकाळाने निधन झालं आहे. मूळचे राजस्थान मधील असलेले सईदुद्दीन डागर हे बंगालमध्ये स्थायिक झाले होते. 1984 पासून ते पुण्यात स्थायिक झाले होते.

धृपद हा भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रकार वैदिक मंत्रांमधील ‘नाद योगा’वर आधारित आहे. अतिशय पुरातन असलेली ही गायकी बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकीरुद्दीन आणि अल्लाबंदे खान ह्यांनी राजपूत आणि मोगल राजदरबारांमध्ये चालू ठेवली होती. पुढे ५ शतकांनंतरही म्हणजे १९-२०व्या शतकात या धृपद गायकीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी डागर बंधू (नसीर मोईनुद्दीन डागर आणि नसीर अमीनुद्दीन डागर) ह्यांनी केली. त्यांच्याच 20व्या पिढीतील धृपद गायक म्हणजे उस्ताद सईदुद्दीन डागर होय.

त्यांच्या देश विदेशात अनेक मैफिली झाल्या. त्यांनी अनेक शिष्यही घडवले. नफिसुद्दीन व अनिसुद्दीन ही त्यांची दोन मुलं २१व्या पिढीतून धृपद गायकीची परंपरा आता पुढे नेत आहेत.त्यांचा दफनविधी आज जयपूरला करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!