Share

धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या ‘दिल की धडकन’; प्रशिक्षक फ्लेमिंगचे कौतुगोद्गार

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलमध्ये गुणतालीकेत खाते उघडले आहे. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला विजय आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला आहे. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईकडून शुक्रवारी २००वा सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यानंतर चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलीयाचा माजी खेळाडू शेन वॉटसन यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यानी सांगितले आहे की, ‘धोनी हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघाच्या काळजाचा ठोका आहे.’

महेंद्रसिंह धोनी हा २००८ पासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. या सामन्यापैकी त्याने २०० पैकी १९९ सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. चॅम्पियन्स लीग २०१२ मधील एका सामन्यात तो कर्णधार नव्हता. तर शेन वॉटसनने सामन्यापुर्वी २०० सामने पुर्ण करण्यासाठी धोनीचे अभिनंदन केले होते. त्याने ट्विट करताना त्यामध्ये, ‘चेन्नई सुपर किंग्जकडून २०० सामने खेळायला बेस्ट ऑफ लक एमएस. आपण संघाची धडकन आहात आणि सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहात.’ असे लिहले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!