Share

तब्बल ४२ महिन्यांनंतर लालूंना जामीन, आजारपणामुळे कोर्टाचा निर्णय

Published On: 

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन मिळाला आहे. दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते ४२ महिन्यांपासून तुरुंगात होते. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ते लवकरच बाहेर येतील.

दुमका कोषागार घोटाळा आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना प्रत्येकी सात शिक्षा सुनावली होती. एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. एकूण चौदा वर्षांची शिक्षा त्यांना भोगायची आहे. लालूंनी दुमका घोटाळ्या प्रकरणी अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यांना अनेक व्याधी आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता, त्यांना जामीन दिला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली केली होती. त्याला सीबीआयने विरोध केला होता.

एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू होईल, असं कोर्टाने म्हटलं असल्याचं सीबीआयने निदर्शनास आणून दिलं होतं. सीबीआयच्या युक्तिवादानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लालूंची बाजू मांडली. सीबीआय जाणूनबुजून लालूंना तुरुंगातून बाहेर येण्यास मज्जाव करत आहे. त्यांची केस विनाकारण लटकवण्याचं काम सुरू आहे, असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. युक्तीवाद ऐकून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. लालू प्रसाद २३ डिसेंबर २०१७ पासून तुरूंगात आहेत. लालूंवर आजारामुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयाच्या निर्णयाने लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. जामीन मिळाल्याने आता कोणत्या रुग्णालयात उपचार करायचे हे त्यांच्यावर अवलंबून असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!