जालना: एकीकडे कोरोना कहर दाखवत असताना दुसरीकडे नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहेत. चंदनझिरा पोलिसांनी १ हजार २१६ लोकांवर कारवाया करून त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, जालना शहरातील आतापर्यंत ५ हजार ९२ जणांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यात ६ लाख २४ हजार ८७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून तीन दुकानेही सील करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील पोलिस ठाण्यांकडून पथके करून कारवाया केल्या जात आहेत. दरम्यान, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलेले आहे. या पथकाकडून विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहेत. औरंगाबाद चौफुली, एमआयडीसी, चंदनझिरा, सुंदरनगर आदी परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत.
काही जण मुद्दामहून याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या कारवायांसाठी एक पथकच तयार करण्यात आलेले आहे. दरम्यान, कारवाया करण्यासाठी पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पीएसआय प्रमोद बोंडले, पोलिस अंमलदार कांबळे, प्रभाकर वाघ, अजय फोके, अनिल काळे, कैलास बहुरे, हिवाळे, साळवे आदींनी कारवाया केल्या आहेत. ठाण्यांच्या विविध हद्दीत ही पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

