Share

‘धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा’

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : काल चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी पुण्याचं तोंडभरून कौतुक केलं. ‘पुणे खरंच असं आहे की सर्वांना स्थायिक व्हावंसं वाटतं.’ यानंतर उपस्थितांनी प्रतिसाद देताच ‘देवेंद्रजी मी जाणार, मी कोल्हापूरला परत जाणार. विशेषतः माझे जे विरोधक आहेत त्यांना जरूर सांगा,’ असं म्हणताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टोला लगावला होता. ‘सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन,परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,’ असं अजित पवारांनी म्हटलं.

“निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,” असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जहरी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तचं बोलू लागले आहेत. स्वतःच्या मागे एक आमदार नाही, फक्त नशिबाने पद मिळालं ते सांभाळा नीट. बोलीचा भात आणि बोलाचीच कढी, फालतू टिपण्या देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम राबवा. मराठा समाज तडफडतोय त्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्या हिंमत असेल तर!’ असं म्हणत त्यांनी थेट पवारांनाच ललकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!