पुणे : ईडी आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अंमलबजावणी संचालनालयाने खडसेंना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतानाच यासंदर्भात संकेत दिले होते. ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आता ईडीचा ससेमिरा माझ्यामागे देखील लावतील, मात्र त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असं विधान खडसेंनी केलं होतं. तर, ‘ईडी दाखवली तर सीडीही निघणार आहे. भाजपचं हे दबावतंत्राचं राजकारण आहे. भाजप हुकूमशाही गाजवत आहे. या कारवाईला काही अर्थ नाही,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती.
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ईडी हि स्वायत्त संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली ईडी काम करत नाही. त्यांच्या काही नोंदी असतात. त्यात काही गैर आढळल्यास ते कारवाई करतात. भाजपचा काहीही राजकीय संबंध येत नाही. तसेच, ‘खडसेंना जी सीडी लावायची असेल ती खुशाल लावावी. गेल्या काही दिवसात न फुटणारे बॉम्ब टाकले जात आहेत’ अशी खिल्ली देखील त्यांनी ‘त्या’ सीडीबाबत उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसेंनी वर्तवलेला ‘तो’ अंदाज खरा ठरला – मलिक
- तुम्ही ईडी दाखवली आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा
- ‘अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं’
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- भुजबळांच्या खात्याशी संबंधित विभागात भ्रष्टाचार; अजित पवारांकडे चौकशीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
