टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्दबातल करण्याचा जो धडाका लावला आहे.त्यात आता अजून एका निर्णयाची भर पडली आहे. कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केली आहे.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि ८ सदस्यांची नियुक्ती ठाकरे सरकारने रद्द केल्याची माहिती आहे. ठाकरे सरकार कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती रद्द करणार नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. मात्र तसं अजिबात झालं नाही.ठाकरे सरकारने फडणवीस सरकारला एक प्रकारचा शह दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्य कृषी आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाशा पटेल यांची नियुक्ती रद्द करत ठाकरे सरकारने भाजपला आणखी एक दणका दिला आहे.सरकार बदलल्यानंतर सत्ताधारी जेव्ही विरोधात जातात तेव्हा सरकारने नियुक्त केलेल्या अध्यक्षांना आणि संचालकांना पद सोडावं लागतं. मात्र काही जण पद सोडण्यास तयार होत नाही. त्यामुळे सत्तेत असलेलं सरकार त्यांच्या नियुक्त्या रद्द करतं.
पाशा पटेलांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने आता राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

