Share

‘परळीत नरेंद्र मोदी काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी विजय माझाचं’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील सक्रीय होत मतदारसंघ पिंजून काढत आहे.

तसेच धनंजय मुंडे यांनी आपण विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे बोलत होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदार संघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, भाजप पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे, असा आरोप यावेळी धनंजय मुंडेनी भाजपवर केला. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183340688445829120?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183340472619503616?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!