🕒 1 min read
Bhaskar Jadhav |मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाले आहेत. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोटनिवडणूक (Election) आली असल्यामुळेही विरोधक आणि सत्ताधाराऱ्यांमध्ये चांगलीच खेळी रंगलेली पाहायला मिळतं आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गट आणि भाजपवर(BJP) अनेक आरोप, टीका केल्या आहेत. अशातच मुंबईमध्ये विरोधकांकडून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात बॅनरबाजी केली आहे.
भाजप पक्षाची भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात बॅनरबाजी
आपण यांना पाहिलत का?, असा प्रश्न बॅनरवर विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर शोधून आणणाऱ्याला 11 रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असं म्हणत भाजपने भास्कर जाधव यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. भाजपने केलेल्या या बॅनरबाजीवर भास्कर जाधव काय प्रत्त्युतर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर आज्ञातांकडून घरावर दगड फेक करण्यात आली. घरावर दगड, स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत. ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे.
तसेच, भास्कर जाधव यांनी घरावर झालेल्या हल्ल्यावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. माझं संरक्षण काढलं आणि त्यानंतर हल्ला करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी असंलं काही अपेक्षित नव्हत असंही त्यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आता पवार आणि शेलार पॅनल देखील ‘या’ स्पर्धेत उतरले असून…”, एकनाथ शिंदे
- Sameer Wankhede | “उपमहासंचालकांनी माझा छळ केला”, समीर वानखेडेंचा एनसीबीवर धक्कादायक आरोप
- Deepali Sayyed | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, “लवकरच माझा…”
- Jayant Patil | “बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमरांना आता पश्चाताप होता आहे”, जयंत पाटलांचा दावा
- Devendra Fadnavis |“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; शरद पवारांच्या विधानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
