Share

चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान , कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला होता . कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं होत.

आता सहकार मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेतल्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!