Share

…तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपाने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामूळे एकतर्फी वाटणा-या या निवडणूकीत रंग भरले आहेत.

सामनाध आवताडे यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मतदान झाल्यावर तुमची वीज बंद नाही केली तर माझे नाव बदला असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. विजेची वसुली म्हणजे मुगलाच्या काळातील जिझिया कराप्रमाणे वसुली झालीय. निवडणूक असल्याने या मतदारसंघात वीज बिल वसुली बंद असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारचा दुराचार चव्हाट्यावर आणून आपली नापसंती दाखवा असे आवाहन फडणवीस यांनी पंढरपूरच्या जनतेला केले.

राज्य सरकारने ५ हजार कोटी रुपयांची वसुली 2 महिन्यात केली. मुंबईतील बिल्डरला वीज बिलात ५ हजार कोटी रुपयांची सूट दिली. कारण त्यांना बिल्डरकडून माल पाणी मिळालं असावं असे फडणवीस म्हणाले. हे लोक हितविरोधी सरकार आहे. सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकार होतं पण आता हे महावसुली सरकार आहे. जिथे मिळेल तिथे फावड्याने माल खा एवढच कामं आहे. हे देशातील सर्वात अधिक रुग्ण असलेलं राज्य असल्याचे फडणवीस म्हणाले. एकट्या महाराष्ट्रात ५५% मृत्यू होत आहेत. महाराष्ट्रात लॉक शाही आहे. लॉकडाऊन करताना ज्यांचे पोट बंद होत त्यांना मदत करणे गरजेचे आहे. छत्तीसगड राज्याने तेथील शेतकऱ्यांना मदत केली. पण इथे सावकारीपेक्षा जास्त सावकारी पाहायला मिळाली अस देखील फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!