सातारा : नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या भर कार्यक्रमामध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या 2 कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली आहे. गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर राज्यात पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाई फेकीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे कृत्य चुकीचे असल्याचे स्पष्टपणे म्हंटल आहे. या घटनेबाबत भाजपच्या दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये केली आहेत.
साहित्य संमेलनामध्ये जाऊन शाई फेकणे पूर्णपणे चूकीचे आहे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्र असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अशा घटना महाराष्ट्राला शोभत नाहीत; शाई फेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन
- गिरीश कुबर यांच्यावर भर संमेलनात शाई फेक
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

