Share

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र कालपासून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत कि असले १०० अजित पवार खिशामध्ये घेवून फिरतात. ते उद्धव ठाकरेंसारखे नाहीत कि सरकारमध्ये काय चालले आहे आणि नाही हेच ठावूक नाही. देवेंद्र फडणवीस हे असामान्य नेते आहेत, शिवसेनेने भयंकर त्रास देवून देखील ते ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले, हि सोप्पी गोष्ट नव्हती.’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तसेच यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणारअसल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!