Share

Vinayak Raut | “शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची यांची लायकी नाही”

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यावरून शिवसेना पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले विनायक राऊत ?

शिवतीर्थावर मेळावा घेण्याची यांची लायकी नाही, असं म्हणत विनायत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा झालाच पाहिजे, अशा विचारांचे संपूर्ण शिवसैनिक आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण शिवसेना आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगर पालिकेने शिवसेनेलाच तिथे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देणं महानगरपालिकेला क्रमप्राप्त आहे. त्यांनी जर ही परवानगी नाकारली, तर कोणत्या पद्धतीने पगवानगी घ्यायची हे शिवसेनेला माहिती असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनीच शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा असं बोललं जात आहे. यावर विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, त्यांचा आधिकार काय, त्यांची लायकी तरी आहे का शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यायची. पुढे ते असंही म्हणाले की, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा आधिकार पहिला बाळासाहेब ठाकरे यांचा होता आणि आता तो आधिकार उद्धव ठाकरे यांचा असून तो कायम त्यांचाच राहणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!