Share

‘राज्य सरकारने हरघर मोदी, घरघर मोदी ही घोषणा कॉपी करून हरघर गोठे, घरघर गोठे अशी केली’

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं. जनतेच्या प्रश्नासाठी २ दिवसांचं अधिवेशन पुरेसं नाही त्यामुळे हे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती. यावर खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अधिवेशन कालावधीवर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

आमच्या योजनांची नावं बदलून तेच पुढे नेलं जात आहे. आमची घोषणा होती हरघर मोदी, घरघर मोदी, त्याची कॉपी ग्राम विकास विभागाने करत हरघर गोठे, घरघर गोठे असं केले. तुम्ही काहीतरी कल्पकता वापरा, आमचं कशाला कॉपी करताय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पुरवणी मागण्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना तीनवेळा पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसात शेत, घरदार वाहून गेलं. असं असताना मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक देण्यात आला. सगळं उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक दिला. आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि शेतकऱ्याची इज्जत राहावी म्हणून तरी केवळ तीन हजारांचा चेक द्यायला नको होता. ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’, अशी परिस्थिती आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!