Share

“शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे…”, ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलत असतांना त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच युतीतली आमची २५ वर्षे सडली, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, ठाकरेंच्या या वक्तव्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’ठाकरेंच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर बघायला मिळाला. २५ वर्षे युतीत सडलो, असे ते म्हणाले. २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. १९८४ मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते’, अशी आठवणही यावेळी फडणवीसांनी करून दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!