🕒 1 min read
मुंबई: भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजपच्या अनेक नेत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रयत कारणी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘देवेंद्र भाऊ विजयी भव: बिहार पाठोपाठ राज्याचे निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.बिहारच्या निवडणुकीप्रमाणेच आपण गोव्यातही यशस्वी नेतृत्व कराल यासाठी आपणास शुभेच्छा’.असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
मा. देवेंद्र भाऊ विजयी भव: !
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेब यांची बिहार पाठोपाठ @BJP4Goa राज्याचे निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
बिहारचा निवडणुकीप्रमाणेच गोव्यातही आपण यशस्वी नेतृत्व कराल यासाठी आपणास शुभेच्छा. pic.twitter.com/qX6rxMSt5g
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) September 9, 2021
दरम्यान फडणवीस यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखली होती. या निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. फडणवीस यांच्या याच अनुभवाचा उपयोग गोव्यात करून घेतला जाणार आहे. अशी चर्चा यावेळी केली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
