टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. तसेच राज्यात युती आणि आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. तसेच युती झाल्यास मुख्यमंत्रीपद कुणाकडे राहिलं अशा चर्चा आता सुरु आहेत.
याविषयी बोलताना फडणवीस यांनी मी पुन्हा येणार हे मी आधीच सांगितले आहे असं विधान केले आहे. तसेच अडीच अडीच वर्षाच काही समिकरण आहे का? याचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, असे काहीच नाही. नेमकं सत्तेविषयी काय करायचंय याविषयी आमची चर्चा झालेली आहे. अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मी मिळून सर्व काही ठरवले आहे. योग्य वेळी आम्ही ते समोर आणू असं विधान केले आहे.
तसेच आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देणार का याविषयी बोलताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवायचे की नाही हा निर्णय त्यांच्या पक्षाला घ्यायचा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत नाही. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारा वेळीही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीसाठी तयारी दर्शवली होती. आता आदित्य ठाकरेंना करायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे असं विधान केले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या संवाद दौऱ्याचे कौतुक केले आहे. त्यांनी ‘आदित्य ठाकरेंच्या यात्रेचा मला आनंद आहे. शिवसेनेचे भावी नेते ते आहेत. आदित्य निवडणूक लढवणार असतील तर त्यांनी लढवली पाहिजे असं मत व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या


