🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतत आहे. मात्र याला अपवाद आहे न्युझीलंड संघाचे खेळाडू, कारण त्यांना १० मे पर्यंत भारतात थांबण्याचा आदेश हा न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला आहे. कारण न्युझीलंड संघाला जागतीक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड संघासोबत कसोटी मालिका खेळायची आहे. पण ११ मे पर्यंत इंग्लंडमध्ये भारतातून येणाऱ्या केवळ त्याच्या म्हणजे ब्रिटीश नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना भारतात थांबावे लागणार आहे.
न्युझीलंड संघाला पुढील महिन्यात इंग्लंड संघाविरोधात २ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. तर भारताविरुद्ध जागतीक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच न्युझीलंडचे काही खेळाडू हे इंग्ंलडमधील ट-२० ब्लास्ट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे इंग्लंडला जातील तर अन्य न्यूझीलंडचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य संघांनी व्यवस्था केलेल्या चार्टर्ड फ्लाईटने आपल्या मायदेशी परततील. अशी माहिती न्युझीलंड प्लेयर्स असोसिएशनचे प्रमुख हेथ मिल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय अहंकाराचा विषय करू नये’
- ‘बंगाल जळत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते गप्प का?’
- ‘मराठा समाजाने कोणाच्या दबावाला अथवा दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्यांना बळी पडू नये’
- अदर पुनावालांना ‘Z प्लस’ सिक्यूरिटी द्यावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’


